गृहमंत्री अनिल देशमुख-एक थोर नेता-उत्तुंग व्यक्तिमत्व आदरनिय गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेब महाराष्ट्रातील राजकारणातील एक द्रष्ट नेतृत्व . सदैव जनतेच्या नाडीवर हात असलेला, जनतेच्या हितासाठी झटणारा, जनतेची अस्मिता जागवणारा, जपणारा नेता... या लेखात मी साहेबांच्या जडणघडणीचा वाटचालीचा आलेख घेत आहे... एखाद्या नेत्याचे नेतृत्व गुन हे अनेक वर्षांच्या अथक प्रयत्न व समाजासाठी केलेल्या कामांमधुन सिद्ध होते. त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात. पण त्यातच त्यांच्या कसबाची कस लागते. सर्व कठीण परिस्थितीतुन जो यशस्वीपणे बाहेर पडतो तोच नेता मानला जातो लोक कल्याणासाठी सातत्याने झटणारा नेताच लोकमानसात उतरतो. मा.अनिल देशमुख यांचे नेतृत्व हे विदर्भातीलच नाही तर साऱ्या महाराष्ट्रातील लोकांनी मान्य केले आहे. साहेब सत्तेवर होते तेव्हा सुद्धा आणि सत्तेत नसून सुद्धा कायम जनसंपर्क ठेवून असतात. साहेबांनी कधीच आ पली नाळ लोकांपासुन तुटू दिली नाही . लोकांच्या नाडीवर बोट ठेवुन ते लोकांशी संवाद...