गृहमंत्री अनिल देशमुख-एक थोर नेता-उत्तुंग व्यक्तिमत्व
आदरनिय गृहमंत्री श्री अनिल देशमुख साहेब महाराष्ट्रातील राजकारणातील एक द्रष्ट नेतृत्व. सदैव जनतेच्या नाडीवर हात असलेला, जनतेच्या हितासाठी झटणारा, जनतेची अस्मिता जागवणारा, जपणारा नेता...
 |
|
या लेखात मी साहेबांच्या जडणघडणीचा वाटचालीचा आलेख घेत आहे...
एखाद्या नेत्याचे नेतृत्व गुन हे अनेक वर्षांच्या अथक प्रयत्न व समाजासाठी केलेल्या कामांमधुन सिद्ध होते. त्यांच्या जीवनात अनेक कठीण प्रसंग येतात. पण त्यातच त्यांच्या कसबाची कस लागते. सर्व कठीण परिस्थितीतुन जो यशस्वीपणे बाहेर पडतो तोच नेता मानला जातो लोक कल्याणासाठी सातत्याने झटणारा नेताच लोकमानसात उतरतो.
मा.अनिल देशमुख यांचे नेतृत्व हे विदर्भातीलच नाही तर साऱ्या महाराष्ट्रातील लोकांनी मान्य केले आहे. साहेब सत्तेवर होते तेव्हा सुद्धा आणि सत्तेत नसून सुद्धा कायम जनसंपर्क ठेवून असतात. साहेबांनी कधीच आपली नाळ लोकांपासुन तुटू दिली नाही. लोकांच्या नाडीवर बोट ठेवुन ते लोकांशी संवाद साधत असतात. साहेबांचा लोकसंपर्क रावां पासुन रंकांपर्यंत आहे. गेल्या २५ वर्षांपासुन सामाजिक बांधिलकिच्या भावनेतुन त्यांनी कामांचा डोंगर रचला आणि कर्तृत्वाचा सह्याद्री उभा केला.
अनिल देशमुख साहेबांच्या राजकारणाला समाजकारणाचा आशय प्राप्त झालेला आहे. राजकारण हे समाजाची उन्नती करण्याचे एक साधन आहे असे साहेब नेहमी म्हणतात. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी वेळोवेळी घेतलेले निर्णय आहे महाराष्ट्राला वैभवाच्या काळाकडे नेणारेच होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री शरदचंद्रजी पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी रोड मॅप तयार केला व करत आहेतच. त्यानुसार अनिल देशमुख साहेबांनी वाटचाल करत आहेत. त्यात काळानुरूप बदलही केले. अनिल देशमुख साहेब हे खरच एक धैर्यशील नेते आहेत. ते नेहमीच परिस्थिती पाहून आणि तिला पोषक असा योग्य तोच निर्णय घेतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून ते शरद पवारांसह कार्यरत आहेत.
साहेबांनी महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात वीस वर्ष मंत्री म्हणुनच काम केले. सांस्कृतिक व शिक्षण मंत्री असताना सिनेमागृहात सिनेमापुुर्वी राष्ट्रगीतची सुरुवात, खासगी शिकवण्यांवर प्रतिबंध, विद्यार्थ्यांच्या दप्तरातील ओझं कमी करून महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात केली. अन्न व नागरी पुरवठा मंत्री असताना गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांवर प्रतिबंध लावला. संगणकीय प्रणालीद्वारे रेशन वाटपाची सुरुवात केली, केरोसिनचा होणारा घोळ थांबविण्याकरिता जीपीएस(GPS)प्रणाली लावली, सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना भारतातील पहीला आणि सर्वात लांब केबलच्या सहाय्याने उभा असलेल्या 4.7 किमीचा "बांद्रा वरळी सी लिंक" पूल निर्माण केला. ज्यामुळे देशाला आणखी एक जागतिक दर्जाचे महत्त्व प्राप्त झाले याचा आम्हाला गर्व आहे. सध्याच्या परीस्थितीत गृहमंत्री पद भुषवित असताना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेकरीता रात्रदिवस एक करुन मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्याच्या खांद्याला खांदा लावून कोरोना विरूध्द लढत आहे व ईतक्या गंभीर परीस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखत आहेत. ईत्यादी महत्वाच्या कामगिरीसह त्यांनी आपल्या कार्यकाळात शेकडो महत्त्वाचे व फायद्याचे निर्णय घेतले. साहेब आज विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत. एक उत्तम नेतृत्व म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक मिळविला आहे. त्यांचे विरोधकही त्यांच्याविषयी आदराने बोलतात व वागतात. ते स्वतंत्र बाण्याचे आहेत. गृहमंत्री या नात्याने साहेब अनेक महत्त्वाचे निर्णय घेत असुन त्याचा संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होत आहे.
साहेब कमी बोलतात पण जे बोलतात त्यामागे विचार, तत्त्व, सत्त्व, महत्त्व, प्रभुत्त्व, विद्वत्ता, अनुभव असतो.
स्वतः च्या प्रकृती स्वास्थ्याला दुय्यम स्थान देऊन ते सामान्य माणसाच्या समृद्धी साठी अथक परिश्रम करत आहेत.
 |
|
सर्वसामान्यांच्या असामान्य नेतृत्वाचा आज वाढदिवस! त्यांची कामाची पद्धत, उमेद पाहिली की वाटते ते अजून तरुण आहेत. आदरणीय साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव त्यांना उदंड आयुष्य देवो वा त्यांचे मार्गदर्शन आम्हाला सदैव मिळत राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना...
शुभेच्छुक-
आकाश राजेंद्र गजबे
जिल्हाध्यक्ष
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस
नागपूर जिल्हा(ग्रा)
मो- 7058187878
Je ahe te sarv saheba mule ahe
ReplyDelete