अजबगजब भाजप मेळावा..

आज मुंबईत भाजपचा वर्धापन दिन मुंबईकरांना वाहतुकीचा ञास देत संपन्न झाला.माझ्या मते वर्धापनदिन म्हणण्यापेक्षा फेकाफेकीचा शो म्हटल तरी चुकीचे होणार नाही.भाजपाने वर्धापनदिनी फक्त राष्ट्रवादी व पवारांनाच टार्गेट केले गेले.का..?
सध्या राष्ट्रवादीचा माजी उपमुख्यमंञी तसेच भावी मुख्यमंञी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली हल्लाबोल आंदोलनाचा चौथा टप्पा चालू आहे.सध्या समाजातील प्रत्येक घटक नाराज आहे त्यामूळे या हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून दादांना प्रचंड जनाधार लाभत आहे.यावरून 2019 चे महाराष्ट्रातील चिञ काय असेल हे सांगण्याची गरजच नाही.
आज चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की छगन भूजबळांच्या बाजूला 2-3 कोठडी मोकळी आहे,असेलही मग त्यात विजय मल्ल्या,नीरव माेदींना टाका ना आणी राहीलेत अजितदादा,ज्यावेळी तुमचे मुख्यमंञी देवेंद्र फडणविस विधानसभेत दादांना क्लिनचिट देत होते त्यावेळी तुम्ही झोपले होते का.फडणविसांनीच कबूली दिली की आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप राजकीय फायद्यासाठी केले होते.तसा भ्रष्टाचारच झालेला नाही.
आज एका गोष्टीच खूप हासू आल,देवेंद्र फडणविस म्हणाले ना की,पवार साहेब औषधालाही शिल्लक राहणार नाही.ज्या शरद पवार साहेब नावाच्या व्यक्तीने आपल्या आयुष्याची 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष समाजकारण,राजकारणात घालविली,पवार साहेबांच्या सोबतचे नेते त्यात अटलबिहारी वाजपेयी,बाळासाहेब ठाकरे,गोपिनाथ मुंडे,देवेगौडा,व्ही.पी.सिंग,सोनिया गांधी अशी कित्येक नावे सांगता येतील.त्यातील काही ह्यात नाही,काही सक्रीय राजकारणातून रिटायर्ड झाली पण त्यांच्यातील एकमेव नेता पवार साहेब राञंदिवस काम करून समाजासाठी झटताेय,त्या पवार साहेबांबद्दल बोलताना लाज कशी वाटली नाही तुम्हाला.पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी,देशासाठी काय योगदान दिले हे सांगण्याची गरज नाही ते सर्वांना माहीती आहेतच पण फडणविस तुमचे महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे ते एकदा सांगा. तुमचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी पवार साहेबांचेच बोट धरून राजकारण शिकलेत हे तुम्ही बहूधा विसरले वाटत.
देवेंद्र फडणविसांनी तर पंतप्रधान नरेंद्र माेदींनाही चहावाला म्हणून हिणवल आणि ज्या गोपिनाथ मुंडेनी भाजपला खर्या अर्थाने लोकांपर्यंत नेली त्यांचा विसर पडला की जाणूनबुजून विसरले कुणास ठाऊक.
अमित शहांनी विरोधकांना साप,कुञा,मुगूंसाची उपमा दिली सध्या तरी महाराष्ट्रात ऊंदीर,शेळी(वाघ),राजीनामे यावरच राजकारण चालू आहे,तशी परिस्थिती तुम्हीच आणून ठेवलीये.
सध्या राष्ट्रवादीला मिळणारा जनाधार पाहून तुमच्या पायाखालची वाळू सरकायला लागली हे नक्की,काहींना तर लूजमोशन झाली आणि काहींची सामना मधून तर भाजपाची आजच्या स्वताच्या कौतुक सोहळ्यातून बाहेर पडली.

           ⏰ आकाश गजबे
           माजी जिल्हाउपाध्यक्ष
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपुर जिल्हा(ग्रा)

Comments

Popular posts from this blog

'मै भी चौकीदार हुं" विरोधात राष्ट्रवादीच्या वतीने तक्रार

अनिल देशमुख-एक थोर नेता-उत्तुंग व्यक्तिमत्व