मै भी चौकीदार हु या पद्धतीचे गाणे युट्युब वर गेले दोन-तीन दिवसांपासुन भारतीय जनता पक्षाच्या वतीने व्हाईरल करण्यात आला आहे. या गाण्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका रणगाड्यावर बसून रणगाड्याची एक क्लिप बनवण्यात आलेली आहे त्या गाण्यामध्ये त्याचा वापर करण्यात आला आहे. या ठिकाणी आवर्जुन सांगायचं की निवडणूक आयोगाने काही निवडणुकीबाबत काही निर्देश घालुन दिले आहेत. 9 मार्च 2019 च्या परिपत्रकानुसार आपल्याला भारतीय सेनेचा कुठल्याही पद्धतीचा वापर भारतीय सैन्यदलाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांच्या किंवा भारतीय सैन्यदलाच्या कुठल्या गोष्टीला वापर हा निवडणूक च्या कॅम्पेन म्हणजेच प्रचारामध्ये करता येणार नाही आहे अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना 9 मार्च 2019 रोजी परिपत्रक काढून निवडणूक निर्वाचन आयोगाने सर्व राजकिय पक्षाच्या लोकांना कळविले आहे. परंतु हे जे गाण गेले दोन दिवसांपासुन व्हाईरल होत आहे या दोघ्या गाण्यांमध्ये आपल्याला सगळ सरळ निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन केलेले दिसून येत आहे . या गाण्याची निवडणूक आयोगाने तपासणी करावी आणि यामध्ये ज्या काही आक्...